उजनी धरणाने ओलांडल्या प्रदूषणाच्या सगळ्या मर्यादा
पुणे, 16 जानेवारी, (हिं.स.)। उजनी धरणाने (यशवंत सागर) प्रदूषणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या धरणातील जलसाठ्यावर प्रदूषणाची कुऱ्हाड कोसळली आहे. धरणातील सध्याची पाण्याची अवस्था पाहता, कधीकाळी
dam


पुणे, 16 जानेवारी, (हिं.स.)। उजनी धरणाने (यशवंत सागर) प्रदूषणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या धरणातील जलसाठ्यावर प्रदूषणाची कुऱ्हाड कोसळली आहे. धरणातील सध्याची पाण्याची अवस्था पाहता, कधीकाळी तळ दाखविणारे चकचकीत भीमेचे पाणी आता गटारगंगा सदृश झाल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.

सध्या हिरव्या गर्द रंगाच्या दुर्गंधीयुक्त थराने उजनीचे पाणी व्यापून गेले आहे. यामुळे प्रदूषणामुळे उजनीचा श्वास गुदमरला आहे.उजनीतील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टिकोनातून राजकर्त्यांनी तत्परता दाखविणे गरजेचे आहे. उजनी धरण भरल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात या धरणात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून रसायनमिश्रीत पाणी, शहराने वापरलेले व प्रक्रिया न केलेले सांडपाणी सर्रास भीमेच्या पात्रात सोडून देण्यात येते. हेच पाणी पुढे उजनीत येऊन साचल्याने त्याला गटाराच्या पाण्याचे रूप येते. याचा येथील स्थानिकांच्या शेतीसह मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. पावसाळ्याची संधी साधून थेट उजनीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande