मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर रवाना
मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. ''वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम''च्या (डब्ल
मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर रवाना


मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असून, राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक खेचून आणणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. त्यापैकी जवळपास ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. यंदा हा आकडा पार करून १६ लाख कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारचा भर असणार आहे.

दरम्यान राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री पुढचे पाच दिवस विदेश दौऱ्यावर असल्याने आणि शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्याने, महापौर निवडीची प्रक्रिया आता मुख्यमंत्र्यांच्या पुनरागमनानंतरच म्हणजेच २३ जानेवारीनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande