जबलपूरमध्ये भरधाव कारने 13 मजुरांना चिरडले; 2 ठार
भोपाळ, 18 जानेवारी (हिं.स.)। मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या कारने 13 मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती
car runs over 13 laborers


car runs over 13 laborers


भोपाळ, 18 जानेवारी (हिं.स.)। मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या कारने 13 मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात बरेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकता चौकात सिग्मा कॉलनीसमोर दुपारी सुमारे दोन वाजता झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांची ओळख चैनवती बाई (40) आणि लच्छो बाई (40) अशी झाली आहे. मृतक आणि जखमी सर्वजण मंडला जिल्ह्यातील बीजाडांडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिहारिया गावचे रहिवासी असून ते दीड महिन्यांपासून जबलपूरमध्ये मजुरीचे काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मजूर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या लोखंडी जाळ्या साफ केल्यानंतर रेलिंगजवळ बसून जेवण करत होते. त्याचवेळी बरेला येथून जबलपूरच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ बरेला पोलिस ठाणे आणि डायल 108 वर संपर्क साधला. पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल पटेल पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णवाहिकेतच जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

जखमी मजूर महंत उईके यांनी सांगितले की, कार अचानक समोर आली आणि काही समजण्याच्या आतच अनेक सहकारी चिरडले गेले. काहीजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते.

या अपघातात गीता बाई उईके (40), गुमशा बाई (40), मीराबाई (45), राजकुमारी बाई (35), वर्षा कुशराम (45), जमुना बाई (40), कृष्णा बाई (40), होरी बाई (35), भगवती बाई (35), ज्ञानवती बाई (41) आणि लक्ष्मी गौंड (40) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी फरार कार चालकाचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि टोल नाक्यांवरील फुटेज तपासले जात आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande