
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी पाच हजार २४ मतदान यंत्रे, दोन हजार ५१२ कंट्रोल युनिट लागणार आहे. ही यंत्रे नांदेडहून मागविली जाणार आहेत. तर मतदारांची एकूण संख्या १८ लाख ७३ हजार असून एकूण दोन हजार २८२ मतदान केंद्र आहेत. तर निवडणूक प्रक्रियेसाठी १० हजार ०४८ अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून १२ हजार मनुष्यबळाची उपलब्धता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, त्यासाठी जिल्ह्यात १९३ अधिकारी, ३०० पोलिस कर्मचारी, १९३२ होमगार्ड्स जिल्ह्यात उपलब्ध आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या बाहेरील जिल्ह्यातून मागविण्यात येणार आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्यात येऊन समाजकंटकांवर कारवाई करण्यात येत आहे. शस्त्र जमा करणे आदी कारवायाही सुरू आहेत, असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
याप्रंसगी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, '६३ गट, १२६ गणासाठी १६ तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून २१ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. २२ जानेवारीला नामनिर्देशन पत्र छाननी होईल व त्यानंतर लगेचच वैध नामनिर्देशित
उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २३,२४ व २७ जानेवारीला सकाळी ११ ते तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पाच फेब्रुवारी २०२६ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.'
एकूण मतदारांची संख्या १८ लाख ७३ हजार असून, दोन हजार २८२ मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी १० हजार ०४८ अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून १२ हजार मनुष्यबळाची उपलब्धता आहे. या मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करुन घेणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे. विविधसमित्यांचे गठन करणे अशा विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ९ निवडणूक निणय अधिकारी व ९ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या सर्व प्रक्रियेवर जिल्हास्तरीय कार्यालयातून नियंत्रण ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितल
निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५०२४ मतदान यंत्रे, २५१२ कंट्रोल युनिट लागणार आहे. ही यंत्रे नांदेड हून मागविली जाणार आहेत. त्यात ३०४८ कंट्रोल युनिट, ५५९२ मतदान यंत्रे येणार आहेत. या यंत्राचे प्रथम स्तरीय पडताळणी जिल्हास्तरावर करुन नंतर ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पाठवण्यात येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis