
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी व इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इजिनियरिंग अॅड मॅनेजमेंट यांच्या वतीने 'डिजिटल युगातील कोशीय लेखनः संकल्पना तंत्र आणि स्वामित्व हक्क' विषयावर १९ व २० जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील सिफार्ट सभागृहात कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे 'मराठी भाषा आणि मराठी विश्वकोष : कोशवाङ्मय परंपरा' विषयावर बोलणार आहेत. यासह भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे 'माहिती तंत्रज्ञानाचा मराठी ज्ञानभाषा निर्मितीतील योगदान', माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर 'वैज्ञानिक कोशीय लिखाण' विषयावर बोलणार आहेत. तर मंगळवारी (२० जानेवारी) विविध सत्रांमध्ये राहुल देशमुख हे 'कोशीय लिखाण आणि तंत्रज्ञान', प्रा. रोहिणी कुलकर्णी 'कोशीय लिखाण कौशल्य आणि शैली', डॉ. मिलिंद दुसाने 'मराठी ज्ञानभाषा आणि माहिती तंत्रज्ञान', कुलगुरू प्रा. सुनील भिरुड 'कोशीय लिखाण आणि स्वामित्व हक्क', प्रा. रंजन गर्गे 'कोशीय लिखाण आणि पारिभाषिक संज्ञा', प्रा. प्रवीण वक्ते 'स्वामित्व हक्क' या विषयावर बोलणार आहेत.
कार्यशाळेसाठी संयोजक प्राचार्य डॉ. संजय डंभारे प्राचार्य डॉ. रत्नदीप देशमुख, संचालक प्रा. सचिन देशमुख, डॉ. स्नेहा खोब्रागडे, डॉ. मनोज म्हस्के, किरण सोनकांबळे, आशिष लहासे आदी परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis