
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे आडस येथील ३३ केव्ही उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचे नवीन विद्युत रोहित्र दाखल झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात अनेक वामागण्या आमदार मुंदडा यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
३३/११ केव्ही क्षमतेच्या या नवीन यंत्रणेमुळे आडस पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यांना आता शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्याच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis