दिल्ली येथील पथकाकडून उदगीर दुध डेअरीची पाहणी
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)। उदगीर येथील दुध डेअरी प्रकल्प पुनर्वसन संदर्भात दिल्ली येथील केंद्र एनडीडीबी (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) चे दोन अधिकारी व महाराष्ट्र राज्य एनडीडीबी चे दोन अधिकारी व नांदेड येथील एनडीडीबी चे एक अधिकारी असे एकूण पाच सदस्
उदगीर दुध डेअरी


लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)। उदगीर येथील दुध डेअरी प्रकल्प पुनर्वसन संदर्भात दिल्ली येथील केंद्र एनडीडीबी (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) चे दोन अधिकारी व महाराष्ट्र राज्य एनडीडीबी चे दोन अधिकारी व नांदेड येथील एनडीडीबी चे एक अधिकारी असे एकूण पाच सदस्यीय पथकाने १६ जानेवारी रोजी उदगीर येथील शासकीय दुध योजना प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. १५ दिवसात केंद्र सरकारकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. व तसेच महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्यात लवकरच एम.ओ.यु. करार होणार आहे. अशी माहिती रविवारी (१८ जानेवारी) उदगीर दुध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने देण्यात आली.

या पाहणी वेळी पुनरुज्जीवन समितीचे अ‍ॅड नरेश सोनवणे, ओमकार गांजुरे, अहेमद सरवर, मोतीलाल डोईजोडे, संतोष कुलकर्णी, कपिल शेटकार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. मागील आठवड्यात दिल्ली येथे उदगीर दुध डेअरी पुनर्वसन संदर्भात झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री ललनसिंग, राज्य सचिव रामास्वामी, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर, व पुनरुज्जीवन समिती सदस्य यांच्यात बैठक झाली होती. तसेच दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उदगीर दुध डेअरी पुनरुज्जीवन समिती चे सदस्य अ‍ॅड नरेश सोनवणे, एस.एस.पाटील यांच्या सोबत महत्वपूर्ण निर्णायक बैठक पार पडली. उदगीर डेअरीचा विषय एन.डी.डी.बी. (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) च्या मराठवाडा, विदर्भ डेअरी विकास आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही बैठक दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असे पुर्नजीवन समितीचे सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande