
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील पेंडगाव येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या अमर पंडितराव बापमारे (वय २६) आणि नाना उद्धव बापमारे या दोन तरुणांच्या दुचाकीला जातेगाव फाटा येथे उसाच्या ट्रकने पाठीमागून भीषण धडक दिली. घडलेल्या या अपघातात अमर बापमारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नाना बापमारे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उसाने भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला असून, माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis