
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)।
'राज्यात नगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाला चांगलेच यश मिळाले आहे. या यशानंतर एमआयएम पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १२ जिल्हा परिषदांमध्ये उमेदवार दिले जाणार आहेत.
एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात एमआयएम जिल्हा परिषद उमेदवार निवड समितीचे सदस्य नासेर सिद्दीकी यांच्यासह शेख अहमद, शारेख नक्षबंदी आणि विकास एडके यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेत एमआयएम उमेदवार देण्याबाबत एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर एमआयएम पक्षाचा समिती सदस्यांनी निर्णय जाहिर केला.
पक्षाचे राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत ८३ नगरसेवक निवडून आले आहे. यानंतर राज्यात झालेल्या वेगवेगळ्या महापालिकेत १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांपेक्षा एमआयएमला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आगामी फेब्रुवारी महिन्यात घोषित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयएम पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवार निवडीसाठी चार जणांची समिती तयार करण्यात आली आहे, '
सोलापूर, सांगली, रत्नागिरी, धाराशिवसह एकूण १२ जिल्ह्यात एमआयएमचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न आहे
'जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या उमेदवार निवड समितीकडे आपले अर्ज सादर करावे. या अर्जाची छाननी आणि उमेदवाराशी चर्चा करून उमेदवारी जाहिर केली जाईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis