
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। अंगणवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व पेन्शन यासारखे मूलभूत हक्क देण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता मजदूर संघाने तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देशभरातील २७ लाख अंगणवाडी सेविकांसह मदतनीस गेल्या अनेक दशकांपासून माता बालक पोषण, सार्वजनिक आरोग्य व सामाज कल्याणाची जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत. मात्र आजही त्यांना श्रमिक दर्जा, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवण्यात येत आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकाळ नियमित व नियंत्रित स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ मानधनधारक स्वयंसेवक न मानता श्रमिक म्हणून मान्यता देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असताना ही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप भारतीय जनता मजदूर संघाने केला आहे. हे प्रश्न सरकारने सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत संघर्षाची भूमिका न घेता संविधानिक व संवाद पत्र आंदोलन राबविण्यात येत आहे. यावेळी भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील, श्रीधर खोत, रामदास तपसे, शेषेराव कसबे यांच्यासह संगीता देशपांडे, मीरा नेहरकर, अंजली खोत, कमल सत्वधर, कमल लांडगे, शाहीन शेख, सुनीता भालेकर, समीक्षा घोडके या अंगणवाडी सेविका, मदतनिस उपस्थित होत्या. शासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घेवून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लाव्याव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
---------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis