मुलांनो खूप खूप शिका...मेहनत करा, मोठे व्हा! राज्यपाल आचार्य देवव्रत
नाशिक, 02 जानेवारी (हिं.स.)।पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी सकाळच्या नाश्त्याच्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडा
मुलांनो खूप खूप शिका.


के के वाघ स्मृती चषक स्पर्धांचे


नाशिक, 02 जानेवारी (हिं.स.)।पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी सकाळच्या नाश्त्याच्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा आदी उपस्थित होते.

राज्यपाल देवव्रत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर नाश्ता घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थी कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे. कुटुंबात सदस्य किती, आईवडील काय करतात, अशी आपुलकीने चौकशी केली. त्यांनी आयुक्त श्रीमती बनसोड यांच्याकडून आश्रमशाळा तेथील शिक्षणाचे माध्यम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांना विद्यार्थिनीने काढलेले लहानसे चित्र भेट दिले. राज्यपालांसमवेत नाश्ता करतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

अस्वच्छता दूर करणे हेच चांगल्या माणसाचे काम-राज्यपाल आपण रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छता करतो. स्वच्छता कर्मचारी अस्वच्छता दूर करतात. अस्वच्छता दूर करणे हेच चांगल्या माणसाचे काम असल्याने प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.पिंपरखेड, ता. दिंडोरी येथे मारुती मंदिर परिसरातआज सकाळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राज्यपाल . देवव्रत यांनी मोहिमेत सहभाग घेतांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. प्रत्येकाने स्वच्छता ठेवून गाव सुंदर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल देवव्रत यांनी गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यपालांनी दिला फिटनेसचा मंत्रराज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसमवेत योगाभ्यास केला. त्यांनी विविध योग प्रात्यक्षिके दाखवितांनाच विद्यार्थ्यांना 'फिटनेसचा डोस, आधा घंटा रोज' असे सांगत तंदुरुस्तीचा मार्ग सांगितला.

राज्यपाल देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे या योगाभ्यासात सहभागी झाले होते. राज्यपाल देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्व सांगत त्याचे लाभ सांगितले. ते म्हणाले, नियमितपणे योग केल्याने शरीर तंदुरुस्त आणि लवचिक राहते आणि सोबतच आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास योग प्रात्यक्षिके केली पाहिजेत. देवव्रत यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्राणायाम, अनुलोम विलोम, सेतुबंध, सर्वांगासन, वज्रासन, वक्रसन, मत्स्यासन, सूर्य नमस्कार, शशांकासन, योग मुद्रासन आदी आसने करीत विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले. ही सर्व आसने केल्याने मन शांत आणि निरोगी राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande