नांदेेड - देगलुरात उपनगराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी
नांदेड, 2 जानेवारी, (हिं.स.)। जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्षपदासह पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले. त्यामुळे आता नगरसेवक उपनगराध्यक्षासह स्वीकृत निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या. नगरपरि
नांदेेड - देगलुरात उपनगराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी


नांदेड, 2 जानेवारी, (हिं.स.)। जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्षपदासह पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले. त्यामुळे आता नगरसेवक उपनगराध्यक्षासह स्वीकृत निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या. नगरपरिषदेच्या निवडणुकीत नाराज झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन देण्यात आले होते.

ओबीसी राखीव महिलेसाठी असलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयमाला बालाजी टेकाळे यांनी बाजी मारली तर एकूण २७ नगरसेवकपदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हा १५ जागा जिंकत नगरपरिषदेत सर्वांत मोठा पक्ष ठरला. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने

उपनगराध्यक्षपदासह संख्या बळानुसार २ स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. या बैठकीत उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीची सूत्रे एक हाती सांभाळणारे लक्ष्मीकांत पदमवार यांच्या पत्नी निवडून आल्या असल्या तरी लक्ष्मीकांत पदमवार हे स्वतः पराभूत झाले. मात्र, पक्षात त्यांचे महत्त्व पाहता स्वीकृत सदस्यपदासाठी पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande