दिल्लीत धुक्याचा कहर; आजही विमाने आणि ४५ हून अधिक रेल्वे उशिराने
नवी दिल्ली , 02 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. शुक्रवारीही दाट धुक्यामुळे अनेक विमानसेवा तसेच ४५ हून अधिक रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याचे चित्र आहे. दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये धुके पडल्यामुळे
दिल्लीत धुक्याचा कहर; आजही विमाने आणि ४५ हून अधिक रेल्वे गाड्या उशिराने


नवी दिल्ली , 02 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. शुक्रवारीही दाट धुक्यामुळे अनेक विमानसेवा तसेच ४५ हून अधिक रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याचे चित्र आहे. दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये धुके पडल्यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

शुक्रवारी दिल्लीकडे येणाऱ्या भुवनेश्वर राजधानी, रांची राजधानीसह ४५ पेक्षा अधिक गाड्या दोन तासांहून अधिक विलंबाने धावत आहेत. अनेक गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करावा लागला आहे. तर नवी दिल्ली–दरभंगा हमसफर विशेष गाडी साडेसहा तास उशिराने, नवी दिल्ली–सोगरिया (कोटा) सुपरफास्ट एक्सप्रेस दोन तास उशिराने, तर नवी दिल्ली–लखनऊ गोमती एक्सप्रेस दीड तास विलंबाने रवाना होणार आहे. संध्याकाळपर्यंत आणखी काही गाड्यांच्या प्रस्थान वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबतच अनेक लोकल गाड्याही उशिराने धावत असल्याने सकाळी कामावर पोहोचताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. वंदे भारत गाड्यांसाठी अतिरिक्त डबे लावण्यात आले असून, त्या वेळेत धावू शकतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande