लातूर - पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तपासणी दौ-यावर
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) मा.श्री. शहाजी उमाप हे वार्षिक परीक्षण, तपासणी व प्रशासकीय आढाव्याच्या अनुषंगाने आठ दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर लातूर जिल्ह्यात उपस्थित आहेत. या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्प
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक .  शहाजी उमाप यांचे लातूर जिल्ह्याचे वार्षिक परीक्षण व तपासणी दौरा


लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) मा.श्री. शहाजी उमाप हे वार्षिक परीक्षण, तपासणी व प्रशासकीय आढाव्याच्या अनुषंगाने आठ दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर लातूर जिल्ह्यात उपस्थित आहेत. या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथील प्रशस्त मैदानावर लातूर जिल्हा पोलीस दलाची भव्य परेड तसेच विविध विशेष पथकांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. या परेडचे परीक्षण मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले. परेडचे संचालन मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांनी अत्यंत शिस्तबद्ध, काटेकोर व नियोजनबद्ध पद्धतीने केले. परेडमध्ये सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपली शिस्त, एकात्मता, शारीरिक क्षमता, प्रशिक्षणाची गुणवत्ता व कर्तव्यनिष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडविले.

परेडनंतर लातूर जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध विशेष पथकांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये मॉब डिसपर्सल पथक, किट परेड, लाठी ड्रिल, स्कॉड ड्रिल, वाद्य पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक यांचा समावेश होता. आपत्कालीन परिस्थिती, जमाव नियंत्रण, दंगल नियंत्रण, दहशतवादी कारवाया तसेच संशयास्पद साहित्याच्या शोध व नाशासाठी पोलीस दल किती सज्ज, सक्षम व प्रशिक्षित आहे, याचे सविस्तर व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सादरीकरण करण्यात आले.मा.श्री. शहाजी उमाप यांनी या सर्व प्रात्यक्षिकांची बारकाईने पाहणी करून पोलीस दलाच्या सज्जतेबाबत समाधान व्यक्त केले.

या वार्षिक परीक्षण दौऱ्याच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यात सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात पोलीस उपमहानिरीक्षक श्री.शहाजी उमाप यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सेवासंबंधी अडचणी जाणून घेतल्या. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभव प्रशासनासाठी मौल्यवान असून, त्याचा योग्य लाभ घ्यावा, असे मत व्यक्त करत उपस्थित प्रश्न व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच लातूर येथील एका सेवानिवृत्त नागरिकाची डिजिटल अरेस्ट या प्रकारातून ₹71,00,000/- इतकी फसवणूक करण्यात आली होती. गुन्हा नोंदवून सायबर पोलीस ठाणे मार्फत तात्काळ तपास सुरू करण्यात आला. संबंधित बँकांशी पत्रव्यवहार, तांत्रिक तपास व मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त करून ₹40,63,870.18/- इतकी रक्कम यशस्वीपणे फिर्यादीस परत मिळवून देण्यात आली. परत मिळवून दिलेल्या रकमेच्या प्रतिनिधिक स्वरूपात चेक पोलीस उपमहानिरीक्षक श्री.शहाजी उमाप यांच्या हस्ते संबंधित फिर्यादी यांना देण्यात आला सदर प्रकरणात सायबर पोलीस ठाण्याकडून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

वार्षिक प्रशासकीय परीक्षण दौरा व सखोल आढावा.

२६ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्याचा सखोल, सर्वांगीण व प्रत्यक्ष वार्षिक प्रशासकीय दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलीस ठाण्यांचे दैनंदिन कामकाज, अभिलेखांची पडताळणी, शस्त्रागाराची पाहणी, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच प्रलंबित व गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची सद्यस्थिती यांचा सविस्तर आढावा घेतला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक साधनसामग्री व वैज्ञानिक पुराव्यांचा प्रभावी वापर करून तपास अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व परिणामकारक करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. गुन्ह्यांचा निपटारा वेळेत होऊन दोषींना कायदेशीर शिक्षा मिळवून देणे हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कायदा व सुव्यवस्था, शिस्त व पारदर्शकता.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना श्री. शहाजी उमाप यांनी अवैध धंदे, गुटखा विक्री, मटका, अवैध दारू विक्री व इतर समाजविघातक कृत्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे स्पष्ट आदेश दिले. कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही अशीच कठोर व पारदर्शक भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या तक्रारींचे तत्पर, पारदर्शक व संवेदनशीलतेने निवारण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘संवेदना’ उपक्रमावर श्री. शहाजी उमाप यांनी विशेष भर दिला. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सन्मानपूर्वक व मानवी दृष्टिकोनातून वागणूक दिली जावी, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा तसेच पोलीस प्रशासन अधिक जनाभिमुख व्हावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande