
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। धारूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. माजलगाव विधानसभा अध्यक्ष जयदत्त नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. प्रकाश सोळंके, नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक नितीन शिनगारे यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली.
या निवडीचा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून पक्षाच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. नितीन शिनगारे हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी नितीन शिनगारे यांची निवड झाल्यानंतर आ. सोळंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis