अमरावती - डॉ. अर्चना अडसड-रोठे नगराध्यक्ष पदी विराजमान
अमरावती, 2 जानेवारी, (हिं.स.)। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड-रोठे (आक्का) यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.यावेळी आमदार प्रताप अडसड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह व जल्लो
डॉ. अर्चना अडसड-रोठे नगराध्यक्ष पदी विराजमान  आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती


अमरावती, 2 जानेवारी, (हिं.स.)। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड-रोठे (आक्का) यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.यावेळी आमदार प्रताप अडसड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह व जल्लोषाच्या वातावरणात पहावयास मिळाले.

धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या निवडणुकी नंतर नव्या नगराध्यक्षा म्हणून डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड–रोठे (आक्का) यांनी पदभार स्वीकारला व नगराध्यक्षा पदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली.

यावेळी नगर परिषद प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी पूनम कळंबे उपस्थित होत्या.दरम्यान आमदार प्रताप अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र चौधरी, डॉ. हेमकरण कांकरीया, गिरीश (बंडू) मूंधड़ा, गोपाल द्विवेदी, रवि कुकरेजा, मुरलीधर पतके, दर्शन राठी, जगदीश राय, विलास बूटले, अंशुल श्यामलाल बड़गैया, मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे यांचे शॉल व श्रीफळ देऊन नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

निवडणुकी दरम्यान अर्चना रोठे आक्का यांना विदर्भाची संघर्ष कन्या म्हणून नवी ओळख जनतेनी दिली आहे.नगर परिषदेच्या कारभारात लोकनिर्वाचित पदाधिकारी पूर्णतः दिलेला जितका मोठा विजय तितकीच मोठी जवाबदारी सुद्धा आहे त्यासाठी मी स्वतः सुद्धा जवाबदरीने सोबत आहे.त्यामुळे डॉ.अर्चना अडसड रोठें नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून विकासाची वाटचाल अधिक गतीने होईल असा विश्वास पदग्रहण सोहळ्यात आ.अडसड यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.अर्चना अडसड रोठे यांनी यावेळी सर्व नगरसेवक कार्यकर्ते व जनतेचे आभार मानले.राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण जवाबदारी स्वीकारतो तेव्हा आपण एक पक्षाचे नव्हे तर सर्व जनतेचे असतो ही शिकवण माझे वडील जेष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांची आहे.त्यामुळे या क्षणापासून कोणताही पक्ष-जात- धर्म न पहाता मी व सर्व नगरसेवक जनतेच्या सेवेत आहेत व कर्तव्यास कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्षा अर्चना अडसड यांनी सांगितले.दरम्याम झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.कार्यक्रमाचे संचलन किशोर बागवान तर उमेश गौंडीक यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी शहरातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande