
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी आहे. पुणे शहरात चारचा प्रभाग आहे. एका इव्हीएम बॅलेट युनिटवर 14 उमेदवारांची नावे असतात. उमेदवारांची संख्या जास्त असेल तर जास्तीत जास्त चार बॅलेट युनिट वापरता येतात. साधारणपणे एका प्रभागामध्ये 55 पेक्षा जास्त उमेदवार झाले तर प्रशासनाला आणखी बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट वाढवावे लागणार आहेत.
त्यामुळे 55 पेक्षा अधिक उमेदवार झाले तर चार पेक्षा अधिक इव्हीएम मशीन वापरावे लागण्याची शक्यता आहे.एका इव्हीएम मशीनवर साधारपणे 16 उमेदवारांची नावे घेता येतात. तसेच, नोटाचा पर्यायासाठी एक बटण राखीव ठेवावे लागणार आहे. तसेच, चारचा प्रभाग असल्याने प्रत्येक प्रभागानंतर एक बटण रिकामे सोडावे लागणार आहे.
या सर्व स्थितीच्या आधारे इव्हीएम मशीन किती लागणार हे स्पष्ट होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अंतिम उमेदवारांच्या संख्येवरून निवडणूक इव्हीएम मशीन किती वापरावे लागणार याचे चित्र शुक्रवारी दुपारी तीननंतर स्पष्ट होणार आहे.एकाच वेळी ४ ते ५ बॅलेट युनिट्स समोर असल्यास आपल्या आवडीच्या उमेदवाराचे नाव आणि चिन्ह शोधताना मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु