
अमरावती, 2 जानेवारी, (हिं.स.) महानगरपालिका निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू असतांना अनेक पक्षात तिकिट वाटपाबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने वेगळी वाटचाल करीत माजी महापौर वंदना कंगाले आणि माजी नगरसेविका शोभा शिंदे वंचित आघाडी, युना. रिप.फोरमकडून मैदानात उतरल्या आहेत.
भाजपा व काँग्रेसमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने पक्ष श्रेष्ठी बद्दल खुपचं नाराजी असल्याचे चित्र आहे. यातच काँग्रेस पक्षाच्या दोन वेळच्या नगरसेविका व माजी महापौर वंदनाताई कंगाले यांनी पक्षाचे प्रामाणिक काम केले तरी जोग स्टेडियम चपराशी पुरा प्रभागातून काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. एका महापौर पदावर बसलेल्या व्यक्तीची तिकीट कापने म्हणजे पक्षात हिटलरशाही सुरू असल्याचे चित्र आहे. भाजप व काँग्रेसची या प्रभागात साठगाठ असल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे २०१७मध्ये अनुसुचित जाती मधून निवडून आलेल्या माजी नगरसेविका शोभा शिदे यांची ही काँग्रेसने उमेदवारी नाकारली.
वंदनाताई कंगाले व शोभा शिदे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी व युनायटेड रिपब्लिकन फोरम या आघाडीकडून निवडणूक लढण्याचे स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच डॉ अलिम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूकीस सामोरे जात आहोत. सर्व पॅनल निवडून येतील असा आमचा ठाम विश्वास आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.डॉ अलिम पटेल, डॉ. निलेश विश्वकर्मा, राहुल मेश्राम व किरण गुडधे यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नातुन मजबुत आघाडी निर्माण करुन अकोला पॅटर्न अमरावती मध्ये स्थापन केला आहे. कार्यकर्त्याला निवडणूकीत उभे राहण्यासाठी एक मजबुत निवडणूकीचे व्यासपीठ निर्माण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी