सोलापूर - दिव्यांग शाळांचे संस्थापक पट पडताळणीमुळे आले टेन्शनमध्ये
सोलापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे संस्थापक विद्यार्थ्यांच्या पट पडताळणीमुळे टेन्शनमध्ये आले आहेत. पट पडताळणीचा अहवाल कडकपणे शासनाच्या दिव्यांग विभागाला सादर करावा अशी भूमिका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप ज
ZP CEO Jagam


सोलापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे संस्थापक विद्यार्थ्यांच्या पट पडताळणीमुळे टेन्शनमध्ये आले आहेत. पट पडताळणीचा अहवाल कडकपणे शासनाच्या दिव्यांग विभागाला सादर करावा अशी भूमिका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी घेतली आहे.

शासनाच्या दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग शाळातील विद्यार्थ्यांची पट पडताळणी एकाच वेळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिव्यांग विभागाचे जिल्हा दिव्यांग अधिकारी मनोज राऊत यांना या आदेशाची कडकपणे अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. जिल्ह्यात दिव्यांग विभागाच्या 60 संस्था आहेत. या संस्थांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची एकाचवेळी अचानकपणे भेट देऊन पट पडताळणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पिशवीतील विद्यार्थ्यांचा पट मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा संस्थापकांची पाचावर धारण बसली आहे. दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी सचिवांच्या आदेशाप्रमाणे न करता पटावरील विद्यार्थी तपासावेत, अशी मागणी संस्थापक करीत आहेत. या मागणीसाठी संस्थापक गेले दोन दिवस जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहेत. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिव्यांग सचिवाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे. यातून दिव्यांग शाळांमधील आता बोगसपट उघड होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande