
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। लातूर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांना ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागामार्फत केली जात होती. मात्र, आता परिवहन विभागाच्या ताफ्यात आता २ नवीन ‘रडार’ वाहने दाखल झाली आहेत. यामुळे महामार्गांवर, रहदारीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर कॅमेरा, सेन्सरद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. अपघात होत असलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे वाहन तैनात केले जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होणा-या ठिकाणी ही वाहने तैनात केली जातील. वाहतूक नियम मोडणा-या वाहनावर ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही या वाहनाद्वारे केली जाणार आहे. या वाहनांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
लातूर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे उद््घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षा विषयक माहितीपुस्तिका, भिंतीपत्रिका, जनजागृती फलकाचे प्रकाशन करण्यात आले.
आपला जीव हा सर्वात मौल्यवान आहे, वेगात वाहन चालवून आपला जीव धोक्यात घालू नका. केवळ दंड वाचविण्यासाठी नव्हे, तर स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहने सावकाश चालवा. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्याची संवेदनशीलता आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
रस्ता सुरक्षा का आवश्यक आहे, याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अपघातामध्ये मृत्यू होणे दुर्दैवी बाब असून, मृत्यूमुळे होणारी हानी भरून न निघणारी आहे. अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. अपघातात होणारे बहुतांशी मृत्यू हे हेल्मेट, सीट बेल्ट न वापरल्यामुळे होतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले. प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणा-या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणारे दयाराम जगन्नाथ सुडे, गणेश गिराम, आबासाहेब शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis