
अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) रवी राणा यांनी भारतीय यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केले. त्या पराभूत झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून, चौका-चौकात केक कापून आनंद साजरा केला. अशा पक्षविरोधी काम करणाऱ्या तुषार भारतीय यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण ताकद खर्ची केली. मैदानात थेट लढण्याऐवजी पराभवाच्या भीतीने भारतीय यांनी खोटी तक्रार केली. वरिष्ठ पातळीवरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रवी राणांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर तुषार भारतीय आणि त्यांचे बंधू आमदार श्रीकांत भारतीय हे सातत्याने दबाव आणत होते, पण अखेर सत्याचा विजय झाला आणि सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. लोकशाहीत अशा प्रकारचे दबावतंत्र वापरणे हे निषेधार्ह असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी