
छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निवडणूकीच्या कामामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीला वेग आला असून, प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी शहरातील एकूण १२६७ मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर केली. तसेच, निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांवर थेट पोलीस कारवाईचा बडगा उगारल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis