
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने अवघ्या ६० दिवसांत३०६८०० मे. टन ऊस गाळप केले असल्याची माहिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे.
आमदार सोळंके यांनी सांगितले की, ७१४५७१९२ लिटर इथेनॉल उत्पादन तसेच १५४८३६०० युनिट वीज निर्मिती करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व विभागप्रमुख, अभियंते, केमिस्ट, सुपरवायझर स्टाफ, कर्मचारी, कामगार, ठेकेदार, ऊस तोडणी मजूर तसेच वाहतूक ठेकेदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे ते म्हणाले.
येत्या हंगामात १० लक्ष मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis