माजलगावच्या मावळ्यांची छत्रपती शिवरायांच्या पाऊलवाटेवरून दुर्गयात्रा
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। माजलगावच्या मावळा ग्रुपने सिंहगड, राजगड, तोरणा आणि रायगड किल्ल्यांची पदभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण केली. तीन दिवसांत सुमारे ८० किलोमीटर अंतर पायी पार करत ही ऐतिहासिक दुर्गयात्रा पार पडली. माजलगाव तालुक्यातील ट्रेकर्सनी छत
माजलगावच्या मावळ्यांची छत्रपती शिवरायांच्या पाऊलवाटेवरून दुर्गयात्रा


बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। माजलगावच्या मावळा ग्रुपने सिंहगड, राजगड, तोरणा आणि रायगड किल्ल्यांची पदभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण केली. तीन दिवसांत सुमारे ८० किलोमीटर अंतर पायी पार करत ही ऐतिहासिक दुर्गयात्रा पार पडली.

माजलगाव तालुक्यातील ट्रेकर्सनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्याची भ्रमंती करीत पाहणी केली.प्रत्येक किल्ल्यावर शिवरायांच्या इतिहासाची उजळणी झाली. स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची जाणीव सहभागी मावळ्यांनी अनुभवली. रायगडावर पोहोचून शिवरायांना मानवंदना देत मोहिमेचा समारोप झाला. या मोहिमेत माजलगावचे गणेश देशमुख, गणेशक्षत्रिय, विलास सोळंके, भागवत उगले, योगेश मस्के, किरण कदम, गणेश नायबळ, प्रमोद साळवे, संदीप खामकर, सुग्रीव भारती, अवधेश शर्मा आणि विशाल तौर सहभागी झाले. शारीरिक क्षमता, मानसिक खंबीरता, शिस्त, संघभावना आणि इतिहासप्रेम यांचे उत्तम उदाहरण ठरलेली ही पदभ्रमंती माजलगावसाठी अभिमानास्पद ठरली. दोन वेळा एव्हरेस्ट सर केलेले भगवान चावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदभ्रमंती झाली. सह्याद्रीच्या दुर्गम भागातील अवघड चढ-उतार, घनदाट जंगल, थंडी, अंधार आणि दमछाक करणारे अंतर पार करत मावळ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाची अनुभूती घेतली. या मोहिमेत सिंहगड, राजगड, तोरणा आणि रायगड या स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश होता.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande