महाराष्ट्र क्रिकेट संघटना रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सदस्यांमध्ये घडवून आणलेली घुसखोरी आणि एमसीएची आगामी ६ जानेवारीला होणारी निवडणूकही नियमबाह्य असल्याबाबतची चार पत्रे माजी सदस्यांनी अंतिम मतदार जाहीर होण्याआधीच निवडणूक अधिकारी अशोक लव
महाराष्ट्र क्रिकेट संघटना रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?


पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सदस्यांमध्ये घडवून आणलेली घुसखोरी आणि एमसीएची आगामी ६ जानेवारीला होणारी निवडणूकही नियमबाह्य असल्याबाबतची चार पत्रे माजी सदस्यांनी अंतिम मतदार जाहीर होण्याआधीच निवडणूक अधिकारी अशोक लवासा आणि के. एफ. विल्फ्रेड यांना दिली आहेत.

एमसीएमध्ये सत्ता राखण्यासाठी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात १५४ सदस्यांची संख्या ५७१वर नेली होती.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेल्या सहा माजी ॲपेक्स सदस्यांनी ही सदस्य भरती बेकायदा आणि नियमबाह्य असल्याचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना देत आपली नाराजी व्यक्त केली होती. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे आता न्यायालयातच या निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे.

मसीएच्या निवडणुकीसाठी वेगवेगळे गट आहेत. त्यात आजीव सदस्य, संस्थापक जिमखाना, इन्स्टिट्यूशन मेंबर, संलग्न क्लब, जिल्हा क्रिकेट संघटना या गटांमध्ये त्या-त्या गटाचे मतदार आतापर्यंत मतदान करत होते. पण, आता सर्व ५७१ सदस्यांना सर्व गटांमध्ये मतदान करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande