नांदेडमधील गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)। नांदेड शहर व परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे करून परिसरातील शांतता भंग करणाऱ्या एका गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर स्थानवद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी नांद
नांदेडमधील गुन्हेगारास ठोकल्या बेड्या


नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड शहर व परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे करून परिसरातील शांतता भंग करणाऱ्या एका गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर स्थानवद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे करून सिडको परिसरातील शांतता भंग करीत होता. यापूर्वी दारू विक्रीसह चोऱ्या, दुखापत करणे यासह वेगवेगळ्या कलमाखाली याच्यावर गुन्हे दाखल आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमध्ये याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासमवेत त्याचे साथीदार यांचाही सहभाग त्याचे निष्पन्न झाले. या तीनही आरोपींना ताब्यात

घेतल्यानंतर चौकशीमध्ये सहमतीनेच गंभीर गुन्हे करत असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी संधी देऊनही सुधारणा होत नसल्याने अखेर त्याच्या विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला. कारवाईला या मंजूर मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून माग काढत लातूर येथून त्याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकात पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक एच घोगरे, यांच्यासह पोलिस अमलदार अकवर पठाण, राजू बोधगिरे, साहेबराव कदम, संतोष पावडे, विठ्ठल वैद्य, गोविंद राठोड व सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande