
अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.)।स्थानिक बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारामध्ये आजनवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर गुरुवार रोजी माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या हस्ते तुर खरदीच्या शुभारंभप्रसंगी '8111 रु. प्रती विटल भाव मिळाला.
तुर खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी आडते मुकेश पंनपालिया व आडत व दिपक राजनकर यांच्या आडत मध्ये तरोडा येथील शेतकरी अरुण कुकडे व गजानन हटवार शेतकरीयांच्यातुरीला मनीषकेला यांच्या खरेदीमध्ये 8111 रु भावमिळाला मिळाला. या तूर खरेदीच्या शुभारंभ माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन शेतकरी बंधुचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावडे यांनी महापुरुषाच्या च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माजी आमदार विरेंद्र जगताप भाषणात म्हणाले की जेव्हा शेतातून शेतमाल निघतो तेव्हा शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे परंतु शासन शेतमाल आयात करते त्यामुळे योग्य भाव मिळत नाही गेल्या एक दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले आहे. यावर्षी उत्पन्न बारापैकी वाटते शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. समितीच्या सभापती कविता गावंडे यांनी आज नवीन वर्ष आहे शेतकरी आडते व्यापारी मापारी हमाल मदतनीस बंधूंना नवीन वर्षाच्या शुभेच्या देऊन आपला शेतमाल बाजार समिती मध्ये किवा शासनालाच विक्री करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, बबनराव मांडवगणे, पंकज वानखेडे, संगीता गाडे तसेच राधेश्याम चांडक, गिरीश भुतडा, मंगेश बोबडे, मुकुंद मोहोरे, विपिन ठाकरे, भाऊराव बमनोटे, विलास भील, संजय गाडे, संजय धामंदे, अवीनटेकाडे, आशिषशिदे, आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी