आनंदवाडी जिल्हा लातूर येथे गाव प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प
लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। निटूरपासून जवळच आसलेल्या आनंदवाडी गौर तालुका निलंगा येथील ग्रामस्थांनी नवीन वर्षारंभानिमित्ता गाव प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ‘नव्या युगाचा हा ध्यास हवा, प्लास्टिक बंदी संदेश नवा’ हा संकल्प करण्यात आला आहे.
आनंदवाडी जिल्हा लातूर येथे गाव प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प


लातूर, 02 जानेवारी (हिं.स.)। निटूरपासून जवळच आसलेल्या आनंदवाडी गौर तालुका निलंगा येथील ग्रामस्थांनी नवीन वर्षारंभानिमित्ता गाव प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ‘नव्या युगाचा हा ध्यास हवा, प्लास्टिक बंदी संदेश नवा’ हा संकल्प करण्यात आला आहे.

आनंदवाडी गौर तालुका निलंगा येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात केला व गावातील सर्व स्त्री पुरुष तसेच तरुण गावातील सर्व व्यापा-याना स्वच्छतेची व प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ देण्यात आली. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी बकेट देण्यात आले. त्याचबरोबर किराणा सामान, भाजीपाला आणण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करण्याची शपथ देण्यात आली तसेच कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्ताने प्रत्येक कुटुंबास दोन कापडी पिशव्या देण्यात आल्या.

जमा होणारा ओला कचरा व सुका कचरा ग्रामपंचायत मार्फत येणा-या घंटागाडीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी माझी ग्रामविकास अधिकारी दत्ता पुरी तसेच विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूल गौर येथील मुख्याध्यापक केशव पाटील, सोमवंशी, ग्रामविकास अधिकारी पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडीचे मुख्याध्यापक पांडुरंग सूर्यवंशी तसेच गावातील नागरिक, महिला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ग्रामपंचायतच्या प्लास्टिकमुक्त गाव या उपक्रमांबाबत सर्वत्र कौतुक होत आहे

याप्रसंगी ग्रामविकास, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य पाणी वापर बचत काटकसर, सौर ऊर्जा वापर काळाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायत सक्षमीकरण यावर विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, जि. प. शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला बचतगट सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande