
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाकडून माजी राज्यमंत्री, खासदार, आमदार, यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्यानंतर पुढची पिढी देखील राजकारणात राहावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या माजी खासदार, आमदार यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे.
पठारे यांच्याकडे एकूण २७१ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यापाठोपाठ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांची मालमत्ता आहे. वांजळे यांच्याकडे ७७ कोटी ६५ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु