
पुणे, 02 जानेवारी (हिं.स.)। निवडणूक काळात प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा–कौसरबाग) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्याउमेदवारांच्या वतीने कोणतीही वैधानिक परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी निवडणूक कचेरी उभारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आदर्श आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ यांचा गंभीर भंग करणारा असल्याचा आरोप 'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप' या सामाजिक संस्थेचे संस्थापक असलमइसाक बागवानयांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कचेरीमुळे सर्वसामान्य नागरिकांची ये-जा अडथळ्यात आली असून मतदारांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, १९(१)(ड) तसेच ३२४ च्या विरोधात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित निवडणूक रद्द करावी तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी'इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप'चे संस्थापकअसलमइसाक बागवान यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेची पवित्रता राखण्यासाठी प्रशासनाने कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु