अमरावती - नामांकन रद्दच्या निर्णयाला राजेश शादी यांचे आव्हान
अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत नामांकन रद्द करण्याच्या निर्णयाला प्रभाग क्रमांक १८-ड - मधील भाजपचे उमेदवार राजेश शादी यांनी नागपूर हायकोर्टात आव्हान दिले आहे. तर प्रभाग क्रमांक १९ ड मधील वायएसपीचे उमेदवार सचिन भे
नामांकन रद्दच्या निर्णयाला शादी यांचे आव्हान राजेश शादी-सचिन भेडे यांची नागपूर हायकोर्टात धाव  नामांकन वैध ठरल्यानंतर भेंडे यांचे कॅवेट


अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत नामांकन रद्द करण्याच्या निर्णयाला प्रभाग क्रमांक १८-ड - मधील भाजपचे उमेदवार राजेश शादी यांनी नागपूर हायकोर्टात आव्हान दिले आहे. तर प्रभाग क्रमांक १९ ड मधील वायएसपीचे उमेदवार सचिन भेंडे यांचे नामांकन वैध ठरल्यानंतर, खबरदारी म्हणून त्यांनीही नागपूर हायकोर्टात कॅवेट दाखल केल आहे.

अमरावतीत महानगरपालिका निवडणूकीत नामांकन प्रक्रिया संपल्यानंतर अर्जाची तपासणी करुन वैध अवैध नामांकनाची यादी तयार करण्याचे काम करण्यात आले. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकनावर विरोधकांकडून आक्षेप दाखल करण्यात आले होते. याअंतर्गतप्रभाग क्रमांक १८ डमधील भाजपचे उमेदवार राजेश शादी यांनी मालमत्तेची माहिती चुकीची सादर केल्यावरुन त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. तरप्रभाग क्रमांक १९ ड साईनगर येथील युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांचे नामांकन रद्द होताना वाचले. भाजप उमेदवार तुषार भारतीय यांनी त्यांच्या नामांकनाला आक्षेप घेतला होता. नामांकन रद्द करण्याच्या निर्णयाला राजेश शादी यांनी नागपूर हायकोर्टात आव्हान दिले आहे. तर सचिन भेंडे यांनी नागपूर हायकोर्टात कॅवेट दाखल करुन सुरक्षीततेचा उपाय केला आहे, जेणेकरुन याप्रकरणी विरोधकांनी न्यायालयात धाव घेतल्यास त्यांची बाजू ऐकण्याची संधी कोर्टाने त्यांना द्यावी. प्रभाग क्रमांक १८ ड राजापेठ, संतकंवरराम येथून राजेश भागचंद शादी यांनी नामांकनावर माजी नगरसेवक मना राठोड, काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी आक्षेप दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन आक्षेप योग्य असल्याचानिर्णय दिला. तर साईनगर येथील युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे हे ठेकेदारी करीत असल्यावरुन तुषार भारतीय यांनी आक्षेप घेतला होता. मात्र सचिन भेंडे यांनी आपल्या वकीलामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांजवळ आपली बाजू मांडली. मागील तीन वर्षापासून ठेकेदारीशी आपला संबंध नसल्याचा त्यांनी म्हटले. त्यामुळे भेंडे यांची उमेदवारी वैध ठरविण्यात आली. दरम्यान या दोन्ही उमेदवारांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande