शकुंतला रेल्वेच्या ११२ व्या वाढदिवसानिमित्त ११२ दिव्यांचा प्रकाशोत्सव
अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) नवीन वर्षाची पहाट जिथे नव्या आशा आणि संकल्प घेऊन येते, तिथे अचलपूर तालुक्यात मात्र सात वर्षांपासून बंद असलेल्या शकुंतला रेल्वेच्या प्रतीक्षेचे सावट कायम आहे. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी शकुंतला रेल्वेच्या ११२ व्या
शकुंतला रेल्वेच्या ११२ व्या वाढदिवसानिमित्त ११२ दिव्यांनी प्रकाशोत्सव   ७ ग्रामपंचायती व ३७ सामाजिक संघटनांचा पाठिंबा; अर्थसंकल्पात “स्पेशल प्रोजेक्ट” दर्जाची मागणी


अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) नवीन वर्षाची पहाट जिथे नव्या आशा आणि संकल्प घेऊन येते, तिथे अचलपूर तालुक्यात मात्र सात वर्षांपासून बंद असलेल्या शकुंतला रेल्वेच्या प्रतीक्षेचे सावट कायम आहे. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी शकुंतला रेल्वेच्या ११२ व्या वाढदिवसानिमित्त रेल्वे स्टेशन, अचलपूर येथे अनोख्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. इंग्रजी परंपरेनुसार केक कापण्यात आला, तर भारतीय परंपरेनुसार ११२ दिवे लावून जीवनवाहिनी ठरलेल्या या रेल्वेला उजाळा देण्यात आला.

१ जानेवारी १९१४ रोजी इंग्रजी राजवटीत बेरारच्या इलीचपूर (अचलपूर) येथून मुर्तिजापूर व यवतमाळकडे धावलेली शकुंतला पॅसेंजर ही हजारो प्रवाशांची जीवनरेषा ठरली होती. प्रवासी वाहतुकीसोबतच कापूस, पिकांचे धान्य, लाल सागवान यांसारख्या मालवाहतुकीमुळे संपूर्ण देशात व परदेशात या भागाची ओळख निर्माण झाली. शंभर वर्षांहून अधिक काळ सेवा दिल्यानंतर २०१९ मध्ये ही रेल्वे बंद झाली. त्यानंतर सलग आठव्या वर्षीही जनतेचा संघर्ष सुरूच आहे.शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने आयोजित ३८ व्या प्रतिकात्मक जनआंदोलनाला तालुक्यातील ७ ग्रामपंचायती व ३७ सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पात शकुंतला रेल्वेला “स्पेशल प्रोजेक्ट” दर्जा द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी नंदेश अंबाडकर यांनी आंदोलन अधिक उग्र होण्याचा इशारा दिला. जमात हिंद–मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष नझीम शेख यांनी निरपेक्षपणे शकुंतला रेल्वेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. योगेश खानजोडे यांनी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये विस्तृत रेल्वे जाळे असताना चार जिल्ह्यांसाठी महत्त्वाची असलेली शकुंतला रेल्वे सुरू का होत नाही, असा सवाल उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande