
सोलापूर, 2 जानेवारी (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता, मागील काही वर्षांत प्रचंड राजकीय उलथापालथ अनुभवलेल्यासोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर, आजभाजपच्या (BJP)आक्रमक राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका – या तिन्ही पातळ्यांवरील सत्तासमीकरणे पाहता सोलापूरची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय राजकारणाला दिशा देणारी ठरणार आहे.
1860 साली अस्तित्वात आलेल्या सोलापूर नगरपालिकेला 1963 साली महापालिकेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर अनेक दशकांपर्यंत महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहरात काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने इतिहास रचत काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आणि सोलापूर महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झाला.ज्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून काँग्रेसने अनेक वर्षे बालेकिल्ला तयार केला होता, त्याच मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे विजयी झाले. इतकेच नव्हे तर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपने जिंकत काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निकालांनंतर सोलापूर जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून पुढे आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड