ठाणे निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी 27 उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे, 02 जानेवारी (हिं.स.)। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 प
ठाणे निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी 27 उमेदवारांनी घेतली माघार


ठाणे, 02 जानेवारी (हिं.स.)। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते.

31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण 99 नामनिर्देशन अर्ज बाद ठरले. उमेदवारांना 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आज दि. 1 जानेवारी 2026 रोजी एकूण 27 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, त्यानंतर एकूण 891 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

उद्या दि. 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, त्यानंतर अंतिमरित्या ‘निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची’ यादी जाहीर होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande