ग्रीनलँडमध्ये अमेरिकेकडून नॉर्डचे लढाऊ विमान तैनात
वॉशिंग्टन, 20 जानेवारी (हिं.स.)।ग्रीनलँडबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण जगात तणाव वाढला आहे. विशेषतः युरोपीय देशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प सातत्याने ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची ध
NORAD aircraft to arrive in Greenland


वॉशिंग्टन, 20 जानेवारी (हिं.स.)।ग्रीनलँडबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण जगात तणाव वाढला आहे. विशेषतः युरोपीय देशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प सातत्याने ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची धमकी देत आहेत. दरम्यान, अमेरिकेने ग्रीनलँडमधील पिटुफ्फिक अंतराळ तळावर उत्तर अमेरिकन एअरोस्पेस संरक्षण कमांड (नॉर्ड )चे लढाऊ विमान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्डने सांगितले की, ग्रीनलँडमधील अमेरिकेच्या दीर्घकालीन नियोजित उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी ही विमानतैनाती करण्यात आली आहे.

अमेरिकेचा दावा आहे की, ग्रीनलँड आणि डेन्मार्कशी चर्चा व समन्वय साधल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. नॉर्डने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, “ नॉर्डचे विमान लवकरच ग्रीनलँडमधील पिटुफ्फिक अंतराळ तळावर दाखल होईल. हे विमान ग्रीनलँडमध्ये आधीपासून तैनात असलेल्या अमेरिका आणि कॅनडाच्या विमान ताफ्यात सहभागी होईल. ही तैनाती नॉर्डच्या दीर्घकालीन नियोजित उपक्रमांना पाठबळ देईल आणि अमेरिका–कॅनडा संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करेल.”

नॉर्डने पुढे स्पष्ट केले की, ग्रीनलँडमध्ये उपस्थित असलेल्या डेन्मार्कसह सर्व सहयोगी सैन्य दलांची कूटनीतिक परवानगी घेतल्यानंतरच या हालचाली आखण्यात आल्या आहेत. ग्रीनलँडच्या सरकारलाही याबाबत पूर्वसूचना देण्यात आली आहे.

अलीकडेच डेन्मार्कच्या सैन्याने ग्रीनलँडमध्ये बहुराष्ट्रीय सैन्य सराव आयोजित केला होता. या सरावासाठी जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, नॉर्वे, नेदरलँड्स आणि फिनलंड यांनीही आपापली सैन्यदले पाठवली होती. डेन्मार्कने अमेरिकन सैन्यालाही या सरावात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते.

व्हेनेझुएलावर यशस्वी सैन्य कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी देत आहेत. अनेक युरोपीय देशांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी, अमेरिकेला पाठिंबा न देणाऱ्या देशांवर १ फेब्रुवारी २०२६ पासून १० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली आहे. तसेच, १ जून २०२६ पासून हे शुल्क वाढवून २५ टक्के केले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande