नोबेल शांतता पुरस्कारावर ट्रम्प यांचे यू-टर्न
वॉशिंग्टन, 20 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी नोबेल शांतता पुरस्काराबाबत आपली जुनी भूमिका पूर्णपणे बदलली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नोबेल शांतता पुरस्काराची त्यांना कोणतीही पर्वा नाही. हे वक्तव्य अश
“मला त्याची पर्वा नाही”, नोबेल शांतता पुरस्कारावर ट्रम्प यांची यू-टर्न


वॉशिंग्टन, 20 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी नोबेल शांतता पुरस्काराबाबत आपली जुनी भूमिका पूर्णपणे बदलली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नोबेल शांतता पुरस्काराची त्यांना कोणतीही पर्वा नाही. हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा त्यांच्याच एका दिवस आधी नॉर्वेच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या धमकीसदृश पत्राची चर्चा सुरू होती.

एका पत्रकाराशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला नोबेल पुरस्काराची काहीही पर्वा नाही. सर्वप्रथम, एका अतिशय चांगल्या महिलेने मला हा पुरस्कार मिळायला हवा असे वाटले आणि ती खरोखरच मला नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छुक होती. याबद्दल मी तिचे आभार मानतो. आणि जर कोणाला वाटत असेल की नॉर्वेचा नोबेल पुरस्कारावर कोणताही प्रभाव नाही, तर ते फक्त विनोद करत आहेत.” दरम्यान, नुकतेच व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी ट्रम्प यांना आपला नोबेल शांतता पुरस्काराचा पदक दिले होते. हा पुरस्कार त्यांना काही महिन्यांपूर्वी मिळाला होता.

सोमवारी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी म्हटले होते,“प्रिय जोनास, तुमच्या देशाने आठहून अधिक युद्धे थांबवण्यात माझी भूमिका असूनही मला नोबेल शांतता पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मला शांततेबाबत पूर्णपणे विचार करण्याची कोणतीही जबाबदारी वाटत नाही. शांतता माझ्यासाठी महत्त्वाची राहीलच, पण आता मी अमेरिकेसाठी काय योग्य आणि हिताचे आहे, याचा विचार करू शकतो.”

यापूर्वी ट्रम्प वारंवार आपण नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असल्याचे सांगत होते. यासाठी त्यांनी मागील वर्षी प्रचारही केला होता. त्यावेळी त्यांनी आठ युद्धे थांबवण्यात आपण मदत केली असल्याचा दावा केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande