यूएईने आणि भारताचा संरक्षण करार किरकोळ नाही – पाकिस्तानी तज्ज्ञ
इस्लामाबाद, 20 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीसाठी फ्रेमवर्क करारावर काम करण्याच्या उद्देशाने आशयपत्र (लेटर ऑफ इंटेंट) वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये २०३२ पर्यंत द्विपक्षीय व्यापार २०० अब्
यूएई राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद दिल्लीत दाखल


इस्लामाबाद, 20 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीसाठी फ्रेमवर्क करारावर काम करण्याच्या उद्देशाने आशयपत्र (लेटर ऑफ इंटेंट) वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये २०३२ पर्यंत द्विपक्षीय व्यापार २०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.या बैठकीवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी सांगितले की,यूएईने भारतासोबत जो संरक्षण करार केला आहे, तो काही हलक्यात घेण्यासारखा नाही. मला वाटते की यूएईला अशी अपेक्षा नव्हती की पाकिस्तान आणि सौदी अरेबिया असे पाऊल उचलू शकतील. ”ते पुढे म्हणाले,“सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला, तर यूएई भारतासोबत उभा राहिला आहे. मग खरेच भारत आणि सौदी अरेबियामध्ये कधी संघर्ष होईल का, की पाकिस्तान आणि यूएईमध्ये तणाव निर्माण होईल?”

यूएईचे राष्ट्राध्यक्ष आपल्या शिष्टमंडळासह सोमवार (१९ जानेवारी २०२६) रोजी सुमारे तीन तासांच्या दौऱ्यासाठी भारतात आले होते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी आशयपत्रावर स्वाक्षरी केली.कमर चीमा म्हणाले, “या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिले तर मला हे एक मोठे प्रकरण ठरणार असल्याचे दिसते. संपूर्ण बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे दोघेच उपस्थित होते; त्यांच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. असे दृश्य आपण यापूर्वी कधी पाहिले नसेल. मला वाटते की या एकांतातील चर्चेत यूएईने भारताला स्पष्ट केले असावे की ते भारतासोबत संरक्षण करारावर स्वाक्षरी करू इच्छितात. हे आशयपत्र यूएईकडून आलेले आहे.”

पाकिस्तानी तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, सहसा अशा चर्चा शिष्टमंडळाच्या पातळीवर होतात, मात्र यावेळी काहीतरी असे घडले आहे जे ते उघड करू इच्छित नाहीत.ते म्हणाले,“एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की, यूएईच्या शिष्टमंडळात संरक्षणमंत्रीही सहभागी होते. आमच्या अमिराती भावंडांनी असा विचार केला असावा की, जर सौदी अरेबियाच्या संदर्भात पाकिस्तानला निष्प्रभ करायचे असेल, तर भारताकडे वळणे योग्य ठरेल—आणि भारतासोबत त्यांचा सहजतेचा स्तर तसाही उच्च आहे.”

कमर चीमा यांनी पुढे नमूद केले की, “जर भारत आणि सौदी अरेबियामधील संरक्षण करार असा असेल की एका देशावर हल्ला झाला तर तो दुसऱ्यावर झालेला मानला जाईल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मला वाटते की हा एक मोठा कार्यक्रम सुरू आहे. यात तेलमंत्री, परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा झाल्या आहेत. अशा घडामोडी मी यापूर्वी कधीही पाहिलेल्या नाहीत.”

ते म्हणाले, “यूएई हेच सांगू इच्छित आहे की आता काहीतरी करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संरक्षण करारानंतर भारत–यूएई करार होणे, हेच दर्शवते की दोन्ही देश पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून विचार करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत बदल झाला आहे. दक्षिण आशियातही बदल झाला आहे. आता पाकिस्तान आणि भारत हे मध्य पूर्वेच्या राजकारणाचाही भाग झाले आहेत—ही बाब लक्षात ठेवावी.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande