छ. संभाजीनगर महावितरणचे 'मिशन नाइन्टी डेज'; थकबाकीदारांचा वीजपुरवठा करणार खंडित
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर परिमंडळात साडेचार लाख ग्राहकांकडे ३०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण प्रशासन मेटाकुटीस आले आहे. थकबाकीचा वाढता डोंगर पाहता महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरव
छ. संभाजीनगर महावितरणचे 'मिशन नाइन्टी डेज'; थकबाकीदारांचा वीजपुरवठा करणार खंडित


छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर परिमंडळात साडेचार लाख ग्राहकांकडे ३०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण प्रशासन मेटाकुटीस आले आहे. थकबाकीचा वाढता डोंगर पाहता महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची 'मिशन नाइन्टी डेज' मोहीम सुरू केली आहे. येत्या मार्चपर्यंत तीन महिने ही मोहीम राबविली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडळात वीजबिल थकबाकीचे संकट गडद झाले आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील जवळपास साडेचार लाख ग्राहकांकडे ३०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे.

वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांसाठी पाच जानेवारी रोजी सर्व उपविभाग कार्यालयांत वीजबिल दुरुस्ती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्रूटी असलेल्या बिलांची दुरुस्ती केली जाईल. ग्राहकांनी मेळाव्याचा लाभ घेऊन वीजबिल दुरुस्ती व बिलांसंबंधीच्या इतर तक्रारींचे निराकरण करून घ्यावे. दुरुस्त केलेले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वीजबिल थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत पाच हजार थकबकीदारांचा वीजपुरवठा डिसेंबर महिन्यात खंडित केला आहे. या कारवाईची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ' साडेचार लाख ग्राहकांकडे ३०० कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande