५ लाखासाठी विवाहितेचा छळ, दुसरा विवाह, पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)। माहेरून पाच लाख रुपये घेऊन देण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पतीने पहिल्या पत्नीची संमती न घेता दुसरा वि
५ लाखासाठी विवाहितेचा छळ, दुसरा विवाह, पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)।

माहेरून पाच लाख रुपये घेऊन देण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पतीने पहिल्या पत्नीची संमती न घेता दुसरा विवाह करून तिची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.

पठाण तब्बसुम वसीम उर्फ सम्यद (रा.माहपल्ली माना किराणा निजामाबाद तेलंगणा ह.मु.सात

सैलानी डॉ झाकीर हुसेन चौक उदगीर) यांच्या जबाबावरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात अन्सार शब्बीर सवद, शब्बीर नजीर सयद इतीमा शब्बीर सयद, सालेहा शब्बीर सयद, निसार शब्बीर सयद, समीर शब्बीर सवद, पशा जाफर सयद, रिमशा सम्मपद (सर्व रा. मालापल्ली निजामाबाद) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी तबसूम यांना सतत शिवीगाळ, मारहाण आणि उपाशी ठेवून अमानुष छळ केला. तसेच पतीने कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत दुसरा विवाह उरकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande