अभाविपचे हिरक महोत्सवी अधिवेशन : पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरणात उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रिय यशवंतराव अभिवाचनातून जीवनकार्याचा प्रेरणादायी वेध नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)। : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पश्चिम महाराष्ट्र) हिरक महोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झालेल्या पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरणात स्
अभाविपचे हिरक महोत्सवी अधिवेशन


प्रिय यशवंतराव अभिवाचनातून जीवनकार्याचा प्रेरणादायी वेध

नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)। : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पश्चिम महाराष्ट्र) हिरक महोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झालेल्या पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरणात स्व. यशवंतराव केळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष दृकश्राव्य अभिवाचन कार्यक्रम प्रिय यशवंतराव सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

स्वयंसेवक, कुशल संघटक व अभाविपचे माजी अध्यक्ष असलेल्या स्व. यशवंतराव केळकर यांच्या साधी जीवनशैली, नेतृत्वगुण, वैचारिक स्पष्टता व कार्यकर्त्यांशी असलेले नाते प्रभावीपणे उलगडण्याचा प्रयत्न या अभिवाचनातून करण्यात आला. लेखक, दिग्दर्शक व निर्माते मिलिंद भणगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सादर झाला.

सानिका आपटे, रविंद्र खरे, अभिजित क्षिरसागर यांनी अभिवाचन सादर केले. त्यांना रोहित गरूड (सतार) यांची साथ लाभली. तांत्रिक सहाय्य दर्शन पोळ, मच्छिंद्र शिंदे, पार्थ धारस्कर यांनी केले, तर संजय जोशी यांच्या कॅलिग्राफीमुळे सादरीकरणाला वेगळी उंची प्राप्त झाली. उत्कृष्ट संहितालेखन, प्रभावी दृकश्राव्य मांडणी व संगीत यामुळे उपस्थितांना जणू प्रत्येक टप्प्यावर ‘यशवंतराव’ भेटत असल्याची अनुभूती मिळाली.

कार्यक्रमादरम्यान चित्रफितीद्वारे दत्तात्रय होसबळे, विनय सहस्त्रबुद्धे, के. एन. गोविंदाचार्य, विनोद तावडे, सदाशिव देवधर, निर्मला आपटे, विद्याधर केळकर, सतिश मराठे, गीता गुंडे, माधव ठाकूर, शशीधर केळकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी यशवंतराव केळकर यांच्या आठवणी सांगितल्या.

यावेळी सुहास वैद्य, प्रा. प्रदीप वाघ, चारुहास वैद्य यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कै. अशोक मोडक, रविंद्र सहस्त्रबुद्धे, दत्ता मिसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande