
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणला आहे.
खामगाव–उमरावती रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणासाठी मंजूर ५० लाख रुपयांच्या कामाचे तसेच १२ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तलाठी भवनाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कामांमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून प्रशासनिक सुविधा देखील बळकट होणार आहेत.
याप्रसंगी श्री.जितेंद्र बाबा जैस्वाल, मंडळ अध्यक्ष श्री.सुचित बोरसे, हौसाताई काटकर, सरपंच श्री.सोमनाथ सोनवणे, श्री.मनोहर सोनवणे, श्री.रवि पवार, श्री.बाबासाहेब सोनवणे, श्री.वसंत जोगदंडे मामा, श्री.हनुमंत खंबाट, श्री.देवीदास काटकर, श्री.अण्णा सोनवणे, श्री.लक्ष्मण बखळे, ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis