
नाशिक, 04 जानेवारी (हिं.स.)
- विरोधकांनी केलेले जाहीरनामे हे कागदावरतीच असतात आणि तिथेच पूर्ण होतात पण भाजपाने आजपर्यंत जनतेलाचे वचन दिले हे जाहीरनामे केले ते पूर्ण करत आली हा फरक भाजपा आणि विरोधकांमध्ये आहे असे स्पष्ट सांगून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
भाजपाच्या प्रचाराच्या शुभारंभ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यापूर्वी आयोजित पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आमदार खासदार व इतर महत्त्वाच्या पदावरती असलेल्या व्यक्तींच्या मुलांना किंवा परिवारातील सदस्यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा अल्पकाळात घेण्यात आला त्यामुळे काही ठिकाणी असे प्रकार झाले आहेत परंतु अशा व्यक्तींना यापुढे कोणतेही मोठे पद दिले जाणार नाही याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे राजू मामा भोळे यांच्या बाबतीत झालेला प्रकार हा नजरचुकीने घडलेला आहे असे त्यांनी स्पष्ट करत सांगितले की रविंद्र धगेकर
यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.
नासिक हे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं होतं याबाबत बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की विरोधकांना आरोप करण्यास पूर्वी माहिती घेण्याची सवय नाही फडणवीस यांनी व्हिजन ठेवून काम केलेला आहे ते पूर्ण ताकतीने काम करतात विरोधकेही त्यांचे कौतुक करतात परंतु आरोप करायचे म्हणून करत असतात आता ते प्रचार सभेला येतील त्यावेळी ते याबाबतची माहिती देतील त्यांनी नाशिक साठी काय केले काय करू पहात आहे. हे स्वतः फडणवीसच सांगतील असे ते म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV