भाजपचा बाबा भिडणार काँग्रेसच्या चेतन नरोटेंशी; सोलापुरात तुल्यबळ लढतीकडे लक्ष
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक प्रभागात चौरंगी लढती होत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभाग पंधरा मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.मागील
news


सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)।

सोलापूर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक प्रभागात चौरंगी लढती होत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभाग पंधरा मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.मागील निवडणुकीत एकमेकांसोबत निवडून आलेले आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे हा विधानसभा निवडणुकीत शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होता पण काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम, मोची समाजाला उमेदवारी न देता शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

त्यामुळे नाराज झालेले मोची समाजातील युवा नेते बाबा करगुळे हे भाजपात गेले त्यामुळे देवेंद्र कोठे हे मोठ्या मताधिक्याने शहर मध्य मधून भाजपचे आमदार झाले. आता होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अंबादास करगुळे आणि चेतन नरोटे हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. अंबादास करगुळे यांना आमदार कोठे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी दिल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

बाबा करगुळे यांची मोची समाज आणि आंबेडकरी समाजात चांगली ओळख आहे फॉरेस्ट आणि कोनापुरे चाळ या भागात त्यांना मानणारा वर्ग आहे. युवाशक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी दिसून येते, प्रत्येकांच्या सुखदुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून बाबाची ओळख आहे. आज पर्यंत करगुळे कुटुंबात महिलेला उमेदवारी गेली. पण भारतीय जनता पार्टीने सर्वसाधारण प्रवर्गातून अंबादास करगुळे यांना उमेदवारी देऊन पहिल्यांदाच या ठिकाणी बाबाला महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande