
अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा 8 किलोमीटर रोड शो पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, ठिक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा गुलाब पुष्पाच्या वर्षावाने त्यांचं स्वागत करण्यात आल, यावेळी कोट्यवधी रूपयांचे विकास कामे आम्ही आणू असा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं,मागच्या काळात भाजपची अमरावती पालिकेवर सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली, तर आता अमरावती शहराला पाणीपुरवठासाठी अमृत योजनेअंतर्गत 998 कोटी रुपये दिले. अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक केंद्र उभारले आहे.
अमरावती मध्ये भुयारी गटासाठी 256 कोटी रुपये देणार आहे.अमरावतीच्या अंबा नाल्यासाठी विकासासाठी 100 कोटीची तरतूद करणार..अमरावतीच्या भुयारी गटार योजनेसाठी 256 कोटीची तरतूद करणार.. त्या संपूर्ण योजनेतून अमरावती शहर विकसित होईल , अमरावती शहराचा विकास होईल त्यामुळे निश्चितच अमरावतीची जनते भाजप सोबत राहील आणि एक मताने बहुमताने भाजपाला अमरावतीकर जनता कौल देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule