विकासाचा नवा ‘बेंचमार्क’ निर्माण करू - डाॅ. निवेदिता एकबोटे
पुणे, 4 जानेवारी, (हिं.स.)। सामाजिक कार्य व जनसेवेत सक्रिय असलेल्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्‍साहात झाला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून सर्वसाधारण ‘ड’ जागेसाठी भाजप- आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्
विकासाचा नवा ‘बेंचमार्क’ निर्माण करू - डाॅ. निवेदिता एकबोटे


पुणे, 4 जानेवारी, (हिं.स.)। सामाजिक कार्य व जनसेवेत सक्रिय असलेल्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्‍साहात झाला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून सर्वसाधारण ‘ड’ जागेसाठी भाजप- आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षांच्या उमेदवार असलेल्या डॉ. एकबोटेंच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने भगिनी सहभागी झाल्या.प्रचाराचा प्रारंभ छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिरात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाला.

या वेळी स्थानिक महिलांनी डॉ. एकबोटेंवर पुष्पवृष्टी करत आणि औक्षण करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या पदयात्रेत जोशी आळी, गणपती चौक, शिरोळे गल्ली आणि संपूर्ण गावठाण परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राजेश पांडे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज, प्रभागातील नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande