
बीड, 04 जानेवारी (हिं.स.)।
बीड शहरात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा पालकमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. अविज्ञान केंद्रात ४ महिती केंद्रांचा समावेश आहे. तारांगणामध्ये विविध ग्रह, तारे, उल्का, आकाशगंगा आदींबाबतची दुर्मिळ माहिती मातृभाषेत मिळणार आहे. प्रशासनाने धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली असून सुमारे १२ हजार चौमी क्षेत्रात साकारण्यात येणाऱ्या या तारांगणामध्ये चार प्रमुख माहिती केंद्रांचा समावेश असणार आहे. या कामाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी १४ कोटी रुपये किंमतीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील काम सुरु होण्याचा मार्ग आता लवकरच सुकर झाला असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगताना दिली.
यात खगोलशास्त्र व अंतराळ विज्ञान, नवोन्मेष व तंत्रज्ञान, पर्यावरण व शाश्वत विकास व सुश्रुत वैदक शास्त्र अशी चार प्रमुख दालनांचा समावेश यामध्ये असणार आहे. सर्व वयोगटातील अभ्यागतांना आकर्षित वप्रेरीत होऊन नवोदीत शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठीया प्रकल्पाचा भविष्यात लाभ होणार आहे. विविध ग्रह, तारे, उल्का, धुमकेतू, आकाशगंगा या बाबतची दुर्मिळ माहिती अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून मातृभाषेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis