लातूर - मुख्यमंत्री फडणवीस यांची ७ जानेवारी रोजी प्रचारसभा
लातूर, 4 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ७ जानेवारी रोजी प्रचारसभा उद्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपाने विकास हा म
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ७ जानेवारी रोजी प्रचारसभा उद्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा


लातूर, 4 जानेवारी (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ७ जानेवारी रोजी प्रचारसभा

उद्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

महानगरपालिका

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपाने विकास हा मुख्य अजेंडा ठरवत प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा व बैठकींचे आयोजन करण्यात आले असून भाजपाचे पदाधिकारी आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून जुन्या घोषणांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप भाजपाने करत, लातूरकरांसमोर ठोस विकासकामे मांडण्याचे आव्हान विरोधकांना दिले आहे.

लातूर शहर महानगरपालिका निवडणूक प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस ही निवडणूक विकास सोडून दुसऱ्या बाजूने नेत आहे. अमित देशमुख यांनी १५ वर्षांत लातूरकरांसाठी कोणता विकास अजेंडा राबवला हे सांगावे. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर किती दिवस निवडणुका लढवणार? त्यांना अभिप्रेत असलेली कामे झाली नाहीत, म्हणूनच विकासाबाबत ते बोलू शकत नाहीत. ही निवडणूक लातूर विरुद्ध निलंगा नव्हे, शहरातील कचरा, स्वच्छ पाणी, वाहतूक, आरोग्य सुविधा यावर काँग्रेसने काय केले हे सांगावे, असे निलंगेकर म्हणाले.

भाजप विकासावर निवडणूक लढवणार असून लातूरकरांच्या प्रश्नांवर काय करणार याचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल. कचरा आणि पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर पुढील विधानसभा निवडणुकीत लातूरकरांसमोर येणार नाही, ही स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. कमळाला मत म्हणजे विकासाला मत हे जनतेला समजले असून भाजपला मोठा

पाठिंबा मिळत आहे. येत्या निवडणुकीत ५० पेक्षा अधिक जागा भाजप जिंकेल, असा विश्वास निलंगेकर यांनी व्यक्त केला.

विरोधक जातीय भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत निलंगेकर यांनी लातूरकरांना सामाजिक वातावरण बिघडू न देण्याची विनंती केली. सोशल मीडियावर जातीय पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज झालेल्या पत्रपरिषदेत दिला.

भाजप शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आज सायंकाळी महाराष्ट्राचे भाजप संघटन प्रमुख ना. चंद्रशेखर बावनकुळे येत असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाची संघटनात्मक बैठक होणार असून उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील साळाई मंडपम येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. भाजपच्या महानगरपालिकेतील

सत्ताकाळातील विकास कामांचा उल्लेख

करत कव्हेकर यांनी विरोधकांना लक्ष्य केले. विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. आमदार अमित देशमुख यांनी गेल्या १५ वर्षांच्या आमदारकीत कोणतेही ठोस विकासकामे केले नाही. भाजपवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतःची कामे लातूरकरांना सांगावीत. शहरात बॅनरबाजी करून दिशाभूल करता येणार नाही. काँग्रेसने काय विकास केला किंवा शहरासाठी कोणती योजना आणली, हे बॅनरवर असायला हवे होते; पण जुन्या घोषणा देऊन लातूरकरांची चेष्टा करण्याचा प्रयत्न होत आहे, असा घणाघात त्यांनी केला.

भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असून सर्व उमेदवार सक्षम आणि उच्चशिक्षित असल्याने शहरातील वातावरण पक्षासाठी पोषक आहे. सर्व पदाधिकारी आणि मंडल अध्यक्ष कामाला लागले असून महानगरपालिका निवडणूक भाजप निश्चित जिंकेल, असा आत्मविश्वास कव्हेकर यांनी व्यक्त केला. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारामुळे शहरात प्रचाराला वेग येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande