
परभणी, 4 जानेवारी, (हिं.स.)। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी मनपा निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी(दि. ५) दुपारी दोन वाजता येथील वसमत रस्त्यावरील विष्णू जिनिंग परिसरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेच्या पूर्वतयारी संदर्भात येथील भाजप जिल्हा शाखेचे बैठक संपन्न झाली.
या बैठकीस पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, माजी आमदार सुरेशराव वरपुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, डाॅ. पंडितराव दराडे, आकाशराव लोहट, डाॅ. केदार खटींग, प्रमोद वाकोडकर, रंगनाथराव सोळंके, बाळासाहेब जाधव, सारीकाताई पारवे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis