काँग्रेसच्या बोलण्यावर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये - माजी आ. अमरनाथ राजूरकर
नांदेड, 04 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या तीव्र आणि आक्रमक टीकेमुळे राजकीय
आणि


नांदेड, 04 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या तीव्र आणि आक्रमक टीकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या बोलण्यावर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे थेट वक्तव्य राजूरकर यांनी भाजपाच्या पत्रकार परिषदेत केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

भाजपाच्या वतीने नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजूरकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर भाजपावर विकासकामांचे श्रेय लाटल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, राजूरकर आक्रमक झाले. काँग्रेसची विश्वासार्हता, तिची राजकीय भूमिका आणि कार्यपद्धती यावर त्यांनी कठोर शब्दांत प्रहार केला. विशेष म्हणजे, अमरनाथ राजूरकर हे स्वतः दीड वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले नेते आहेत. खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळेच त्यांच्या त्यां या वक्तव्याकडे राजकीय निरीक्षक विशेष लक्ष देत आहेत.

राजूरकर म्हणाले की, काँग्रेसकडे आता जनतेला दाखवण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले

नाही. त्यामुळेच भाजपावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नांदेड शहरामध्ये जे काही ठोस विकासकामे झाली आहेत, ती केवळ आणि केवळ खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच झाली आहेत, असा दावा त्यांनी केला. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, तसेच विविध पायाभूत प्रकल्प यांचे श्रेय भाजपाच्या नेतृत्वालाच जाते, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून सातत्याने भाजपावर श्रेयवादाचा आरोप केला जात असताना, राजूरकर यांनी उलट काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली.

पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपामधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत चालले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande