दानवेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या उमेदवारांची रणनीती
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)| भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशा पद्धतीने विजयी होतील, याच्या दृष्टीने नियोजन व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशा पद्धतीने विजयी होतील, याच्या दृष्टीने नियोजन व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)| भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशा पद्धतीने विजयी होतील, याच्या दृष्टीने नियोजन व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा कार्यालयात संपूर्ण शहरातील उमेदवारांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशा पद्धतीने विजयी होतील, याच्या दृष्टीने नियोजन व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. तसेच उमेदवारांच्या अडचणी व समस्या समजून घेत त्यावर आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आ. संतोष पाटील दानवे, आ. नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगरपालिका भाजपा अध्यक्ष भास्कर आबा दानवे तसेच शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

 rajesh pande